तभा फ्लॅश न्यूज : पूरग्रस्त हसनाळ येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य नाणीज धाम यांच्या सेवा समीतीच्यावतीने ग्रामस्थांना साडी, ब्लँकेट, तांदूळ, तेल या रेशन किट सह दूपारच्या जेवनाची व्यवस्था करण्यात आली.
लेंडी नदीच्या महापूराने हा हा कार माजवला चार गावे अक्षरशः पाण्यात बूडाली सर्व काही सोडून लोक सूरक्षीत ठिकाणी आसरा घेतला. त्यामुळे त्यांच्या कडे अंगावरील कपड्याशिवाय काहीच उरले नाही हे पाहता अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थान नाणीज च्या सामाजिक उपक्रम अंतर्गत नांदेड दक्षिण व मूखेड व राजूरा सेवा समीती च्या वतीने आपदग्रस्त लोकांना अंगावर ओढण्यासाठी ब्लँकेट ,साडी ,जेवनासाठी तांदूळ, तेल या सारख्या अत्यावश्यक वस्तू व ग्रामस्थांना दूपारच्या जेवनासाठी खिचडी वाटप करण्यात आली.
यावेळी नांदेड दक्षिणचे निरीक्षक बालाजी कोठारे, जिल्हा अध्यक्ष शामभाऊ नागलगावे,मष्णाजी पैलवार, सचिव राम माचिनवाड,महिला अध्यक्षा सौ.पूजाताई उमाटे ,दत्तात्रय बेंजलवार ,संजीवनी प्रमुख शंकर पा.नकाते, मूखेड ता.अध्यक्ष मारोती ईबितवार,बालाजी चंदावार,राम मूद्देवाड यांच्या सह तालुका सेवा समिती व भक्त शिष्य उपस्थित होते.