सोलापूर – जिल्ह्यातील बालकलाकारांमध्ये लोककलेचा प्रसार व्हावा या उदात्त हेतूने बालरंगभूमी परिषदेतर्फे एकदिवसीय “जल्लोष लोककलेचा” हा भव्य लोककला महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ६ ते १५ वयोगटातील बालकलाकारांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ मिळाले. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात दीपप्रज्वलन आणि नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले
याप्रसंगी उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, नाट्यपरिषद शाखा सोलापूरचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार,
बालरंगभूमी परिषद सोलापूरच्या अध्यक्षा सीमाताई यलगुलवार, मंगळवेढा शाखाध्यक्ष तेजस्विनी कदम आणि हरिभाई प्रशालेच्या प्राचार्या दीपा फाटक, बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, उपाध्यक्ष खंडू शिंदे व गोवर्धन कमटम, प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ, सहकार्यवाह संजय सावंत, प्रशांत देशपांडे, मच्छिंद्र सपताळे आणि लोककला महोत्सव समिती प्रमुख सुभाष माने यांचे व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती
अध्यक्षीय भाषणात प्रकाश यलगुलवार यांनी नमूद केले की, “बाल व किशोरवयीन कलाकारांमध्ये अभिनय, गायन, नृत्य व इतर कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राच्या लोककला प्रकारांची ओळख करून देण्यासाठी हा महोत्सव एक हक्काचे व्यासपीठ ठरत आहे.” असे त्यांनी सांगितले
या महोत्सवात एकूण पाच लोककला प्रकारांचा समावेश होता:
एकलगायन, एकल नृत्य, एकल वाद्य, समूह गायन, समूह नृत्य या पाच लोककला प्रकारात सुमारे अडीचशे बालकलाकाराने सहभाग घेतला होता. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अन्नपूर्णा साखरे, मिलिंद ठोंबरे, असलम मुलाणी, ज्योतिबा काटे, सुमित फुलमामडी, व्यंकटेश रंगम, अशोक किल्लेदार यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच, सर्व कार्यकारणी सदस्य आणि पालक आणि बालकलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू शिंदे यांनी केले, तर शेवटी अर्चना अडसूळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.




















