सोलापूर – मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेत १४ नोव्हेंबर रोजी ‘बालदिन’ व कै. सिद्रामप्पा हत्तुरे यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली. याबरोबरच प्रथम सत्रात शालेय स्तरावरील स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, मेडल व गुलाब पुष्प देऊन सत्कार सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आला. बालदिनाचे औचित्य साधून शाळेतील सर्व बालचमूना खाऊ वाटप करण्यात आले.
प्रथम शाळेचे मुख्याध्यापक सचिन जाधव, सुधाकर कामशेट्टी, बालअध्यक्ष आरव राठोड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू तसेच सिद्रामप्पा हत्तुरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. दरम्यान मुख्याध्यापक सचिन जाधव यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. बालअध्यक्ष आरव राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईसाअली मुल्ला, अध्यक्षीय निवड गौरी डोमनाळे, अनुमोदन समृद्धी माळी, सूत्रसंचालन सृष्टी जामगे व आभार समिक्षा थिटे यांनी केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक सचिन जाधव, सुधाकर कामशेट्टी, संगीता हुमनाबादकर, सर्व शिक्षक वर्ग, सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला. बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन मनिषा पाटील मॅडम यांनी केले.


















