अक्कलकोट : उसाचा ताजा रस, पावभाजी, कचोरी, पाणीपुरी, सुगंधी दूध, फूड सॉलिड, थंड मठ्ठा, कोल्ड्रिंक्स, गरमागरम आप्पे आदींचा आस्वाद घेऊन विद्यार्थी तृप्त झाले. निमित्त होते कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयाकडून आयोजित फूड फेस्टिवल कार्यक्रम
विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करावी, उद्योग व्यवसायाची आवड निर्माण व्हावी म्हणून कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने फूड फेस्टिवलचे आयोजन केले होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून फूड फेस्टिवलचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, सचिव मल्लिकार्जुन मसुती, ज्युनिअर विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
फूड फेस्टिवल उपक्रमाचे नियोजन पुनम पोकळगी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा सलोनी शहा, प्रा गुरुशांत हपाळे, शिल्पा धूमशेट्टी, संगीता स्वामी, शितल फुटाणे, मधुबाला लोणारी यांनी केले.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
फूड फेस्टिवल मधील विविध पदार्थांचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. या फेस्टिवल मधील साहित्याची मांडणी अतिशय नीटनेटके होते. सर्व विद्यार्थ्यी युनिफॉर्म मध्ये उपस्थित होते.
कल्याणशेट्टी कनिष्ठ महाविद्यालयातील फूड फेस्टिवलचा शुभारंभ करताना संचालिका शांभवी ताई कल्याणशेट्टी, मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर



















