सोलापूर – विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व उद्योजकीय कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.
या फेस्टिवलचे उद्घाटन माजी प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे सर,प्रभारी मुख्याध्यापक रमेश दिंडोरे सर, प्राथ.मुख्याध्यापक सचिन जाधव,सुधाकर कामशेट्टी,अण्णाराया तुप्पद,विनायक हत्तुरे,भारत राऊत,पालक प्रतिनिधी मल्लिकार्जुन स्वामी, सिद्रामप्पा कलशेट्टी,कैलास करकंटी यांच्या उपस्थितीत सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी तयार केलेले पदार्थ खरेदी करून त्याचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या फूड फेस्टिवलमधून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री नफा-तोटा व व्यवहार ज्ञान याविषयी ज्ञान मिळाले.
या फूड फेस्टिवल मध्ये पाणीपुरी, वडापाव, पॅटीस,भेळ, पोहे, सुशिला, ढोकळा,कच्ची दाबेली,गुलाब जामुन, इडली वडा ,पोहे,उपीट,दाल चावल, समोसा, खस्तापुरी, गोबी मंचुरियन, पुरी भाजी,मोमोज, दही वडा,पावभाजी,खीर,केक, मसाला पापड,चहा, मठ्ठा, सुगंधी दूध, इ.पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते.
हे फूड फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक गंगाराम घोडके,परमेश्वर चांदोडे,दत्तात्रय आगरखेड,अनिता हौदे,सुकेशनी गगोंडा,प्रा.लक्ष्मीकांत पनशेट्टी,प्रशांत हरके,श्रीनिवास कोलपॅक, संतोष स्वामी,अनिलकुमार गावडे,रमेश आगवणे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.























