सुस्ते – दिवाळीनिमित्त फराळाच्या साहित्याचे वाटप करून गोरगरिबांची दिवाळी गोड करणे. हा तुषार चव्हाण यांनी गेली 13 वर्षापासून राबवलेला सामाजिक उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी केले.
सुस्ते (ता.पंढरपूर) येथे दिपावलीनिमित्त माजी उपसरपंच तुषार चव्हाण यांच्यावतीने गोरगरीब गरजूंना फराळाच्या साहित्याच्या किटचे वाटप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी धनश्री पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे होते.यावेळी सुस्ते येथील संजय ब्रह्मदेव मोरे यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तुषार चव्हाण मित्र परिवाराच्यावतीने त्यांचा प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भीमा साखर कारखान्याची व्हाईस चेअरमन सतीश जगताप,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण,भीमा कारखान्याचे संचालक गणपत पुदे, महादेव देठे, माजी उपसरपंच तुषार चव्हाण,अंबिका उद्योग समूहाचे विजय सुरवसे,पांडुरंग ताटे,रामदास चव्हाण,तानाजी चव्हाण, धनंजय सालविठ्ठल,दीपक वाडदेकर,रणजीत चवरे,जगदंब फायनान्सचे चेअरमन हनुमंत चव्हाण,अॅड. विजयकुमार नागटिळक,धनंजय घाडगे,संजय चव्हाण,धनाजी शिंगण, बाळासाहेब सालविठ्ठल, दिलीप रणदिवे, संजय लोखंडे, हनुमंत चव्हाण, पांडुरंग कदम, तानाजी रणदिवे, पंकज चव्हाण, वैभव चव्हाण, कुमार सालविठ्ठल, राजाभाऊ चव्हाण, मनसेचे धनाजी चव्हाण,बालाजी चव्हाण, शंकर सुर्वे, गणेश बोबडे, विष्णू गावडे, हनुमंत कांबळे, संजय खवळे, हनुमंत बोबडे, दिलीप शिनगारे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन बिभीषण सालविठ्ठल यांनी केले.