अर्धापूरकराकडून होणार जंगी स्वागत…!
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच यांचे अर्धापूर नगरीत आगमन होत आहे. त्यांचे भारतीय जनता पार्टी व अर्धापूरकराकडून आज दि.२७ मार्च रोजी चार वाजता जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तसेच वसमत फाटा ते पार्डी पर्यत भव्य रोड शो काढण्यात येणार आहे. तसेच पार्डी म. येथे सभा घेऊन समारोप करण्यात येणार आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गत महिन्यात भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. आणि अवघ्या दोन दिवसांतच त्यांची राज्यसभेच्या सदस्य पदी निवड झाली. खा.चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अख्खा जिल्हा पिंजून काढत आहेत. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात खा.अशोकराव चव्हाण यांनी भेटी दिल्या आहेत. अर्धापूर शहरात पहिल्यांदाच खा.चव्हाण यांचे आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी भव्य तयारी करण्यात आली आहे.
नांदेड येथून निघाल्यानंतर दि.२७ मार्च सायंकाळी चार वाजता आगमन होणार आहे. वसमत फाटा-तहसिल कार्यालय समोरील टिपू सुलतान चौक-महात्मा बसवेश्वर चौक, सखाराम लंगडे कॉम्प्लेक्स, अहिल्यादेवी होळकर चौक, खंडोबा मंदिर आदी ठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच अर्धापूर शहरातून मोटारसायकल रॅली व रोड शो काढण्यात येणार आहे. तसेच पार्डी म. येथे किशोर स्वामी यांच्या शेतामध्ये सभा घेऊन समारोप होणार आहे. यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख, माजी महापौर किशोर स्वामी, धर्मराज देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव इंगोले भाऊराव कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, बाजार समिती सभापती संजय देशमुख लहानकर, श्यामराव पाटील टेकाळे, सुभाषराव कल्याणकर, मारोतराव कानोडे, मुसव्वीर खतीब, योगेश हाळदे, व्यंकटराव साखरे, बाबुराव लंगडे, पंडीतराव लंगडे, प्रल्हाद माटे, प्रविण देशमुख, व्यंकटी राऊत, उमेश सरोदे आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील भाजपा-महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बालाजीराव गव्हाणे, राजेश्वर शेटे वतीने करण्यात आले आहे.