तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
दाभाडी सर्कल मधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने
“भगवा सप्ताह” निमित्त पदाधिकाऱ्यांची बैठक माजी आमदार संतोष सांबरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती , या प्रसंगी भाजप व इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला ,
शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी ,संघटनात्मक बांधणी ,नवीन मतदार नोंदणी व आगामी निवडणुकीच्या पूर्व तयारी साठी माजी आमदार संतोष सांबरे यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले , या प्रसंगी मा आमदार संतोष सांबरे यांच्या सह उप जिल्हाप्रमुख भगवानराव कदम , कारभारी म्हसलेकर ,राजू गव्हाड ,रामेश्वर फंड ,सगीरभाई , डॉ दत्तू तिडके ,असिफ पटेल ,रामभाऊ म्हसलेकर ,गणपत गव्हाड ,काशिनाथ टेकाळे ,गणेश अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती ,
या वेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले कि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेनेची यशस्वी घोडदौड सुरु आहे ,आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली पाहिजे ,बदनापूर विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजार शिवसेना सदस्य नोंदणी फॉर्म भरून शिवसेना भवन येथे पाठवणार असल्याचे त्यांनी नमूद केले ,
शिवसेनेची संघटनात्मक ताकत वाढवावी ,गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक निर्माण करावा आणि उद्धवजी हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागण्याचे आवाहन केले , मा उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी दोन लाख रु पर्यँतची सरसकट कर्ज माफी दिली पण या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कापूस ,सोयाबीन व इतर मालाला कवडीमोल भावाने विकावे लागले ,शेतकऱ्यांची दुर्दशा या सरकारने केली म्हणून आगामी निवडणुकीत भाजपाला गाडून भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे माजी आमदार संतोष सांबरे यांनी सांगितले ,
भाजप आमदार नारायण कुचे यांनी मोठ्या प्रमाणात भ्र्रष्टाचार केला असून सत्तेच्या माध्यमातून मोठी संपत्ती जमा केली आहे ,प्रत्येक कामात टक्केवारी घेणे ,शेतकर्यांच्या विहिरीच्या कामात कमिशन घेणे ,ग्रामपंचायत कामात हस्तक्षेप ,भांडणं लावणे ,जाती जाती मध्ये तेढ निर्माण करणे असेच कामे केलेले असल्याने कुचे यांचा पापाचा घडा भरला आहे ,जनता यांना गाडल्याशिवाय राहणार नाही असे माजी आमदार संतोष सांबरे यांनी घणाघाती टीका केली ,
उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम व कारभारी म्हसलेकर यांनी आपल्या भाषणात शिवसैनिकांनी बूथ निहाय यंत्रणा मजबूत करावी व आगामी सर्व निवडुकांसाठी पक्ष संगठन मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त केली ,लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मताधिक्य मिळाले त्या पेक्षा हि जास्त मतदान आगामी विधानसभा निवडणुकीत करवून घ्यावे असे भगवानराव कदम यांनी सांगितले
या वेळी भाजपचे तळणी ,लोधेवाडी ,म्हसळा ,भातखेडा ,दाभाडी इ गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी मा आमदार संतोष सांबरे व मान्यवर नेत्यांच्या शुभहस्ते शिव बंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला ,
या मध्ये सर्जेराव ओलेकर ,भाऊसाहेब ओलेकर ,रामहरी ओलेकर ,बबन जाधव ,शिवाजी गव्हाड ,जावेद पठाण ,अझीम मिर्झा ,वसीम मणियार ,मंजूर सिद्दीकी ,अब्रार सिद्दीकी सह शेकडो कार्यकर्तांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला ,