श्रीपूर – रोटरी क्लब अकलूज व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी महिला कामगार यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख संदीप लोणकर, डॉ. अभिजीत मगर, अजित वीर, मनीष गायकवाड, अभिषेक टेके, ओजस दोबाडा, गजानन जंवजाळ, यबाजी सर, पांडुरंग कारखान्याचे कृषी अधिकारी संतोष कुमठेकर, चीप अकाउंटंट रवींद्र काकडे, कृषी विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पोफळे, डॉ.प्रमोद पवार, सेक्रेटरी भीमराव बाबर तसेच कॅन्सर तपासणीसाठी कराड मेडिकल कॉलेज सातारा येथील आलेले डॉ आरुषी शर्मा, डॉ नेहा पडवळ, सागर पवार डॉ. तनवी डांगे, दिशा पारगे, सुषमा शेटे, शितल पोळ, प्रिया कदम, माधुरी गायकवाड, गुंजन पाटील, आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तपासणी बरोबरच कॅन्सरची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना व वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कारखान्याच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ कारखान्याचे कर्मचारी, ऊस तोडणी महिला कामगार यांनी घेतला. अनेक जणांनी तपासणी करून आरोग्याबाबत जागरूकता व्यक्त केली.
वेळीच तपासणी केल्यास कॅन्सरवर यशस्वी उपचार शक्य असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पांडुरंग कारखान्या नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतो यामध्ये ऊस तोडणी महिला महिला कामगारांना साड्या, लहान मुलांना स्वेटर्स या वस्तूंचे वाटप करून सामाजिक उपक्रमही राबवण्यात आला .
श्रीपूर येथिल महिलांच्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन प्रसंगी डॉ . यशवंत कुलकर्णी व अधिकारी .

























