बार्शी – तालुक्यातील गाडेगांव येथे मातृभूमी प्रतिष्ठान संचलित भगवंत नेत्रालय यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक विकास भालके यांच्या पुढाकारातून व नियोजनातून हे शिबीर पार पडले.
शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ७१ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीनंतर १३ रुग्णांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी व डोळ्यांच्या आजारांचे लवकर निदान व्हावे, या सामाजिक उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरामुळे अनेक नागरिकांना नेत्ररोगांबाबत योग्य मार्गदर्शन व उपचाराची संधी मिळाली. यावेळी माजी उपसभापती अविनाश मांजरे, नेत्रालय समितीचे अध्यक्ष प्रा. किरण गाढवे, उद्योजक विकास भालके, सरपंच कौसर मुलाणी, उपसरपंच गजानन बोराडे, सोसायटी चेअरमन विक्रम जगताप, माजी उपसभापती अविनाश मांजरे, तसेच डॉ. अमित भालके, अनिकेत भालके व अक्षय भालके उपस्थित होते.


























