नवीन नांदेड प्रतिनिधी
सिडको येथील मनपाच्या मातृसेवा आरोग्य केंद्र येथे दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी रुग्णाच्या रक्ताच्या तपासणी यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या तपासण्या वैद्यकीय अधिकारी मधुमेह तज्ञ डॉ. संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी करण्यात आली.
नांदेड येथील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ तथा मनपा सिडको मातृसेवा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी सिडको येथील रुग्णांना आरोग्य विषयक विविध तपासण्या करण्यात आल्या यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या तपासणीसाठी जवळपास १२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २० रुग्णांना रक्तदाबाचा आजार आढळून आला, व २५ रुग्णांमध्ये मधुमेहाचे आजार आढळून आले. सदरील तपासण्या या मोफत शिबिरा मार्फत करण्यात आल्या.
यावेळी रुग्णाच्या तपासणीसाठी एका नामांकित फार्मा कंपनीचे एम.आर. रिंकेश गुंडावार व सुधीर मूर्ती यांनी तपासण्याचे प्रात्यक्षिक करून घेतले. सदरील मोफत तपासणी शिबिर हे महिन्यातून दोन वेळा घेण्यात येईल अशी माहिती सिडको मनपा दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांनी दिली यावेळी येथील आरोग्य कर्मचारी परिचारिका पल्लवी मुगटकर, सुरेश अरगुलवार, विष्णुदास गलपवाड, पदरे, राजश्री कराडखेले, सुखदेव जोंधळे यांची उपस्थिती होती