पिलीव – माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्याचयावतीने दिवाळीनिमीत गत हंगामात गाळपास ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मोफत साखर वाटपांचा शुभारंभ चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे होते.यावेळी प्रगतशील बागायतदार रामभाऊ मगर यांनी या कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील, संचालक प्रशांतराव बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सर्व सामान्य शेतकरी ,कर्मचारीवर्ग यांचे हित जोपासत असुन याचाच एक भाग म्हणून कारखाना दरवर्षीच दिवाळीनिमीत शेतकऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मोफत साखर वाटप करते.
तसेच दिवाळीनिमीत कारखान्याने शेतकऱ्यांना 205 रुपयांचा दुसरा हप्ता दिला आहे.यामुळे या साखर कारखान्याने 3005 रुपये एवढा उच्चांकी दर देऊन या भागात आदर्श निर्माण केला आहे.यामुळे सध्या शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.या साखर वाटप कार्यक्रमास चांदापुरीचे माजी उपसरपंच तात्या चोरमले,चिफ इंजिनिअर तानाजी देवकते, केन मॅनेजर शरद देवकर, समाधान गायकवाड, ऊस उत्पादक शेतकरी महादेव मगर,किसनराव मगर,सर्जेराव पिंगळे,नितीन जाधव, बाळासाहेब मोटे,मोहन मगर, धर्मा बोडरे,यासह ऊस उत्पादक शेतकरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार रमेश आवताडे यांनी मानले.
चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्याचा मोफत साखर वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करताना सरपंच जयवंत सुळ,जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे व इतर मान्यवर.