वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे विवेकानंद केंद्र, सोलापूर व स्वामी समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय मौफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.पर्यावरणमित्र दिनकर तुकाराम नारायणकर यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त वळसंग आणि परिसरातील नागरिकांसाठी पाच दिवसांचे मोफत योग शिबिराचे सुरू करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत सदस्य विनोद सुरपुरे,हुतात्मा जलसंवर्धन समितीचे पदाधिकारी वीरेश बागलकोटी,रवी कलशेट्टी, बसवराज दुधगी,सादिक पटेल,अजय काळे, परशुराम चौगुले, पार्श्वनाथ खोबरे,संजय मणुरे,मल्लिनाथ ढब्बे यांनी या शिबिराचे आयोजन केले असून स्वामी समर्थ विश्राम धामच्या सभागृहात पहाटेच्या गुलाबी थंडीत हे शिबिर घेतले जात आहे.विवेकानंद केंद्राचे योगशिक्षक रवी कंटली,शिक्षक मेघराज हुणचे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने शिबिरार्थींना योग प्रकार शिकवित आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्धारूढ काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अँड संजय गायकवाड, स्वामी समर्थ सूतगिरणी संचालक सतीश ईसापुरे, सिध्दाराम चौगुले, निवृत्त पी.एस.आय खंडु शिंदे, अनिल म्हेत्रे,गणेर शास्त्री,बलभिम गुरव , महादेव सातलगाव यांच्यासह तनिष्का व्यासपीठाच्या गटप्रमुख श्रीमती प्रतिभा दुधगी, गटप्रमुख सौ.वंदना नारायणकर व वळसंगच्या नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला.




















