परतुर: प्रतिनिधि
मानवी जीवन स्वातंत्र्यामुळे समृद्ध बनवता येते, जीवनाला दिशा मिळते,स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य हा सर्वात मौल्यवान शृंगार आहे असे प्रतिपादन आनंद प्राथमिक माध्यमिक व आनंद इंग्लिश स्कूल परतूर येथे ध्वजारोहण प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.भानुदास कदम यांनी केले.
७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यालयामध्ये तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.रांगोळी स्पर्धा, चित्रकला, कलाकृती निर्माण करणे,अशा उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम, उपाध्यक्ष डॉ भानुदास कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.भानुदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह भारताची विविधतेतील एकता आपल्या सादरीकरणातून दाखवली.बालवाडीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती सत्यशीला तौर, मुख्याध्यापक संजय कदम, इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल नारायण सागुते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.