नांदेड – आगामी चालू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहत असल्याने धनेगाव सर्कल मधून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषदेसाठी निष्ठावंत कार्यकर्ते बालाजी भायगावकर व उद्धव शिंदे हे दोघेही कामाला लागले आहेत. तेव्हा पक्षश्रेष्ठी पुढे आव्हान असणार आहे. दोघांपैकी कोणाची वर्णी लागणार याकडे पूर्ण सर्कलचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुका २०२५ या अनुषंगाने सर्कल मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उद्धव शिंदे व बालाजी भायगावकर हे दोन्हीही कार्यकर्ते मोठ्या उमेदीने सर्कलमध्ये मतदारांशी भेटीगाठी घेऊन कॉर्नर बैठकावर जोर दिला आहे. हे दोन्ही कार्यकर्ते आजपर्यंत पक्षाची एकनिष्ठ राहून पक्षांच्या जडणघडणासाठी अहोरात्र कार्य करत आले आहेत.
पक्षाची एकनिष्ठ राहून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तसेच जनतेची विकासात्मक कार्य केले आहेत. दोन्ही उमेदवार धनेगाव सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तेव्हा आमदार हेमंत पाटील व आमदार आनंदराव पाटील बोंढारकर हे या दोघांपैकी कोणाला न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही इच्छुक उमेदवारा पैकी एक उमेदवार निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठींना मोठ्या आव्हानास तोंड द्यावे लागेल.
यामध्ये बालाजी भायगावकर यांचे सामाजिक उपक्रम राबवणे व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याची चर्चा मतदारातून ऐकावयास मिळते. पण उद्धव शिंदे हे देखील सामाजिक कार्यात मागे नसल्याचे बोलले जाते या दोन इच्छुक उमेदवारा पैकी एकाना न्याय देताना पक्षश्रेष्ठीची प्रतिष्ठा पणला लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















