सोलापूर – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सोलापुरातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मंगळवार दि.२३ डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी दिली. मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून जुनी मिल कंपाउंड येथील राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात होणार आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे तब्बल ४५० इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीकडे आल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. मुलाखती झाल्यानंतर निवडणूकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी भवन येथे वेळेवर उपस्थित राहावे तसेच कोणत्या प्रवर्गातील इच्छुक आहात त्याचे जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रत सोबत घेऊन यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

























