अक्कलकोट – प्रत्येक गावातील तलाव उजनी पाण्याने भरावी असे विविध मागण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यातील कलहिप्परगे येथे शेतकऱ्यांच्या हितार्थ २४ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणास सुरवात केले आहे.
अक्कलकोट तालुक्यात तरुणांना रोजगारासाठी मोठे उद्योगधंदे एमआयडीसी आणा. विनापरवाना झाड तोडलेले सोलर कंपनीवर कारवाई व्हावी व सोलर कंपनीने तोडलेले झाड प्रत्येक सोलर कंपनीकडून किमान एक लाख झाडाची तालुका प्रशासनाचे वतीने पुनर लागवड करून घ्यावी. देगाव कालवा एक्सप्रेस उजनी पाण्याने नागणसूर जिल्हा परिषदेतील सर्व गावांना जोडा. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती,कर्जमाफी करा. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई शासकीय पंचनामा ग्रहाय धरून पिक विमा रक्कम खात्यावर जमा करा.शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुराचे प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये शासनाकडून नुकसान भरपाई द्या.करजगी ते कलहिप्परगा रस्ता तात्काळ मंजूर करून काम चालू करावे. शेतकऱ्यांसाठी हमीभाव केंद्र चालू करून हमी भावाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांची शेतातील धान्य व पिकवलेले शेतमाल खरेदी करावी. अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावातील तलावाला उजनी पाण्याचा जोड देऊन उजनी पाण्याने तलाव भरा. देगाव कालवा एक्सप्रेसचे पाईपलाईनचे प्रत्येक तलावाला लिंक देऊन उजनी पाण्याने जेऊर मंगरूळ व नागणसूर जिल्हा परिषदेतील तलाव भरा.
तालुक्यातील प्रत्येक गावात संबंधित तलाठी द्वारे चावडी वाचन करून अन्नसुरक्षा योजनेत गोरगरिबाची मोफत स्वस्त धान्य योजनेत समाविष्ट करा. तालुक्यातील अवैध मटका जुगार गुटखा विक्री हातभट्टी दारू अवैध वाहतूक, स्वामी भक्ता कडून पैसे वसूल करणे अवैध मुरम उपसा व वाळू वाहतूक बंद करा.मराठवाडी तलावाचे १९ लाख रुपये प्रमाणे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करून तलावाचे काम ताबडतोब चालू करा. अक्कलकोट शहरास दररोज पाणीपुरवठा करावे. असे विविध १४ मागण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या समवेत अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कलहिप्परगी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
हा लढा माझ्या एकट्याचा नसून तालुक्याचा व संपूर्ण तालुक्यातील शेतकरी बांधवांचा आहे. या उपोषणाला अक्कलकोट तालुक्यातील जनतेने व शेतकऱ्यांनी एकजूट होऊन पाठीशी राहून आशीर्वाद द्यावा.
आनंद बुक्कानुरे
शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख.


















