करकंब : बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखा ही पंढरपूर आणि परिक्षेत्रातील गावांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते.चालू आर्थिक वर्षात शासनाच्या विविध योजना बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर संबंधित विविध शाखांमध्ये पोहचवत असल्याने ही शाखा ग्राहकांसाठी वरदान ठरत आहे.
शासनाच्या विविध योजना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या बँकेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा नेहमीच प्रयत्न असतो देगाव ता.पंढरपूर येथील शेतकरी अनिल घाडगे यांना शाखेने एआयएफ आणि महा डीबीटी योजनेअंतर्गत अत्याधुनिक हार्वेस्टिंग ऊस तोडणी मशीनसाठी अर्थसहाय्य केले.
याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखेचे शाखा अधिकारी चंद्रकांत मोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बँकेच्या विविध शेतीविषयक तसेच सरकारी अनुदानित योजनांविषयी माहिती देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केले.पारंपरिक शेतीच्या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कशी मात करता येईल यांविषयी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली.
तरुणांनी नोकरीसाठी शहरात जाण्याऐवजी आपल्याच परिसरात अत्याधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करून आपली आर्थिक प्रगती करण्याविषयी त्मार्गदर्शन केले.याप्रसंगी शेतकरी बांधव,ग्रामस्थ, शाखाधिकारी चंद्रकांत मोरे,बँक प्रतिनिधी अमोल नलवडे,प्रगतशील शेतकरी अनिल घाडगे,धर्मेंद्र घाडगे, संजय शिंदे,चेतन घाडगे,हर्षल पाटील उपस्थित होते.




















