अक्कलकोट – तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस कडून खासदार प्रणितीताई शिंदे,यांच्या प्रमुख उपस्थित इच्छुक उमेद्वारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यावेळी तडवळ ४,जेऊर ५ , नागणसुर २, वागदरी २, चपळगांव १, असे पाच जिल्हा परिषद साठी एकूण १४ जणांची मुलाखती घेण्यात आले.तर पानमंगरूळ २,सुलेरजवळगे २, जेऊर ५ ,दहिटने २, नागणसुर २, तोळनूर २, चपळगांव ४,कुरनूर २,वागदरी ३,शिरवळ २ असे एकूण १० पंचायत समिती साठी २६ जणांची मुलाखती घेण्यात आले.
आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष अक्कलकोट तालुक्यात संपूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे संकेत खासदार प्रणितीताई शिंदे यांनी यावेळी दिले.या मुलाखतीस मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली.यावेळी काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार, महिला जिल्हा अध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील हे प्रमुख उपस्थितीत होते.
















