श्रीपूर – महाळुंग , ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद मुंडफणेवस्ती शाळेस विद्यार्थ्यांची शैक्षणीक प्रगती तसेच सामाजीक बांधिलकी जपत ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टलरीज लिमिटेड, श्रीपूर यांचे वतीने कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया यांच्या हस्ते देण्यात आला . या प्रसंगी मुख्याध्यापक वाघ , शिक्षक मुलाणी , सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक व महाळुंग–श्रीपूर नगरपंचायतीचे नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत ‘ संगणक तज्ञ योगेश जोशी , उपस्थित होते .
याप्रसंगी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया म्हणाले, “आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. संगणक हे केवळ एक साधन नसून ज्ञानप्राप्तीचे प्रभावी माध्यम आहे. मात्र ग्रामीण व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, याची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. लहान वयातच संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, त्यांची विचारशक्ती विकसित होते आणि भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी विद्यार्थी सक्षम बनतात .संगणकामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक रंजक, सुलभ आणि परिणामकारक होते. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मुले नवीन गोष्टी आत्मसात करतात, संशोधनाची गोडी निर्माण होते आणि त्यांची सर्वांगीण शैक्षणिक प्रगती घडते. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कोणत्याही बाबतीत मागे राहू नयेत, त्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच संधी मिळावी, या भावनेतून ब्रिमासागर कारखान्याच्या वतीने ही छोटीशी मदत देत असल्याचे सेठीया म्हणाले .
तर नानासाहेब मुंडकणे यांनी ब्रिमा सागर कंपनीच्या सामाजीक उपक्रमाचे आभार मानले .
महाळुंग मुंडफणेवस्ती जि.प. शाळेस ब्रिमासागर कारखान्याच्यावतिने संगणक भेट देताना भरतकुमार सेठिया . नानासाहेब मुंडफणे, दिनकर बेंबळकर, चंद्रकांत भागवत, व शिक्षक .

















