:मागील 26 वर्षापासून अखंडपणे आणि सातत्याने येथील मातोश्री हंसादेवी सरकटे सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित व प्रा. राजेश सरकटे यांची निर्मिती व संकल्पना असलेला ‘गजर विठ्ठलाचा’ हा आषाढी महोत्सव याही वर्षी संपन्न होत आहे. सलगपणे 27 व्या वर्षी येथील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये दिनांक 17 जुलै बुधवार रोजी सायं.7.45 वाजता हा महोत्सव सादर होणार आहे. या आषाढी महोत्सवाचे उद्घाटन व विठ्ठल पूजन मा. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते होणार आहे. तर विशेष उपस्थिती
अभिनेत्री अनुष्का सरकटे व अभिनेते निखिल चव्हाण यांची असणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.केंद्रीय अर्थराज्यमंत्री खा. डॉ.भागवत कराड,महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री ना. अतुल सावे खा.संदिपान भुमरे,महाराष्ट्र राज्याचे मा. शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. अंबादास दानवे,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. सतीश चव्हाण,आ. संजय शिरसाठ आ.संतोष दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवामध्ये राजेश सरकटे, नितीन सरकटे व पायल सरकटे विविध संत महंतांची अविट अशी भक्तीगीते सादर करणार असून निवेदन प्रा. रवींद्र मगर करणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये साथसंगत संगीतकुमार मिश्रा (सारंगी , मुंबई) प्रथमेश साळुंखे (बासरी मुंबई सिद्धांत व्यवहारे( तबला) विजेंद्र मीमरोट,गौरव तांबे,अंकुश बोर्डे, रविंद्र प्रधान, विजय खंडागळे करणार आहेत .या भक्ती संगीत महोत्सवाच्या प्रवेशिकांसाठी रसिकांनी 10 ‘स्वरविहार’ मोरेश्वर हाऊसिंग सोसायटी गारखेडा, श्री. गजानन महाराज मंदिर गारखेडा आणि संत एकनाथ रंग मंदिर येथे संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्था प्रमुख संजय सरकटे व विनोद सरकटे यांनी केले आहे.