बाणेगांव- येथील मयुरेश्वर फाऊंडेशन संचलित गॅलेक्सी पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून विद्यार्थी व पालकांना मंत्रमुग्ध केले.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मराठी अभिनेता किशोर महाबोले उपस्थित होते तर संस्थापक डॉ. सुहास राऊत, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.स्वप्नील राऊत, बाणेगांवचे सरपंच लिंबाजी जाधव, मार्डीचे सरपंच प्रांजली पवार, सेवालालचे सरपंच दिपाली राठोड. शाळेच्या मुख्याध्यापिका विजया नारायणकर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे किशोर महाबोले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी सादर केलेले वेगवेगळे कार्यक्रमामुळे मी मंत्रमुग्ध झालो. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये स्टेजवर नाट्य सादर करण्याची भिती निघुन जाते व त्यांचे वेगवेगळ्या भूमिकेत अभिनय सादर करण्याची रूची वाढते. ही शाळा ग्रामीण भागात असून सुध्दा त्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दलची जी तयारी केलेली हे शाळेची एक उत्तम कामगिरी आहे. त्यानंतर प्रोजेक्ट डायरेक्टर स्वप्नील राऊत आम्ही या शाळेला भारतातील 500 टॉप शाळेमध्ये नेण्याचा मानस असल्याचे सांगितले.















