तभा फ्लॅश न्यूज/नायगांव : बंटी मुलकेवार या मुर्तीकारने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षात गणेश भक्तांचे आवडी लक्षात घेऊन विविध आशा नाट्यछटा आपल्या कलेच्या माध्यमा तून साकारीत हजारो मुर्त्या साकारल्या असुन.महा राष्ट्र राज्यांतूनचे नव्हे तर परराज्यातून देखील अनेक गणेश भक्त मंडळानी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीच्या
पुर्व संध्येला “मंगलमूर्ती मोरया…” चा गजर, ढोल- ताशांचा निनाद, आणि भक्तीमय वातावरणात येणारा गणराजांचा उत्सव! अशा या मंगलप्रसंगी येथील ‘एकता गणेश आर्ट’ मध्ये तयार झालेल्या गणपती बाप्पांच्या मुर्ती खरेदी करण्यासाठी अनेक गणपती मंडळाने आज खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बंटी मुलकेवार व साईनाथ मुलकेवार यांच्या नेतृत्वाखालील एकता गणेश आर्ट मध्ये विविध शैलीतील गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली आहे. मागील अकरा वर्षांत उत्कृष्ट दर्जा आणि कल्पकतेच्या जोरावर या छोट्याशा कारखान्याने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
गणेशभक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्याच्या सिमेवर आसलेल्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या शेजारील राज्यांतून येणारा मूर्तीखरेदीचा ओघ थांबवून, स्थानिक उत्पादनाला प्राधान्य दिल्याने ग्रामस्थांतही समाधानाचे वातावरण आहे.