मंगळवेढा – नगरपालिका शिक्षण मंडळ, मंगळवेढा संचलित कै.नानासाहेब नागणे प्रशाला न.पा. मुला-मुलींची शाळा नं.4 नागणेवाडी, मंगळवेढाचे पदसिद्ध मुख्याध्यापक गंगाधर कोळी यांची मंगळवेढा नगरपालिका केंद्राच्या केंद्रसमन्वयक पदी निवड करण्यात आली.
मंगळवेढा नगरपालिका केंद्रामध्ये नगरपालिका, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित तसेच स्वयंअर्थसहायता अशा शाळांचा समावेश होतो. या सर्व शाळा व प्रशासन यांचा उत्तम समन्वय साधण्याच्या दृष्टीने मंगळवेढा नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बिभीषण रणदिवे यांनी गंगाधर कोळी यांची केंद्रसमन्वयक पदी नियुक्ती केल्याचे पत्र कार्यालयामार्फत पाठवण्यात आले.
काही दिवसांपासून रिक्त असलेले केंद्र समन्वयकाच्या पदी गंगाधर कोळी सरांची निवड झाल्याबद्दल सर्व शाळांमधून व शिक्षकांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच पद्धतीच्या केंद्र समन्वयकाची आवश्यकता आहे अशा पद्धतीचे वक्तव्य शिक्षकांच्या मुखातून येतात.
मुख्याध्यापक गंगाधर कोळी सर यांचे अभिनंदन सर्व शाळा मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य व पालक वर्गातून मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छापर सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आला.


















