वाळूज एमआयडीसी पोलिसांची कारवाई
वाळूज महानगर (प्रतिनिधी) : औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी मध्ये एक व्यक्ती गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती दारावर मार्फत पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी छापा मारला असता एक व्यक्ती गांजा विक्री करत असल्याचे व त्यासोबत काही व्यक्ती गांजाचे नशा करत असल्याचे आढळून आले या सर्व व्यक्तींना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
जोगेश्वरी भागात हबीब आबुद शेख रा. जोगेश्वरी ता. गंगापुर हा राहत्या घरात अवैधरित्या गांजा विक्री करत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे यांनी पथकासह सदर ठिकाणी छापा मारुन हबीब आबुद शेख वय 52 वर्ष व्यवसाय रिक्षा चालक रा. आंबेडकर नगर, पाण्याचे टाकीजवळ, जोगेश्वरी ता. गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या घरातुन 20,736 /- रु.किं.चा 01 किलो 152 ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाचे झाडपत्ता (गांजा) जप्त करुन गांजा पिताना मिळुन आलेले शिवाजी मोतीराम भगुरे वय 27 वर्ष रा. आंबेडकर नगर, जोगेश्वरी , रविंद्र चंद्रकांत निकम वय 45 वर्ष रा. वडारवाडा, ता. श्रीरामपुर जि.अ.नगर , कल्याणसिंग सांडुसिंग डोंगरजाळ वय 58 वर्ष रा.आबेडकर नगर जोगेश्वरी , अहेसान मुस्ताक शेख वय 24 वर्ष रा. सिल्क मिल्क कॉलनी रेल्वे स्टेशनजवळ ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले. पोलीस अंमलदार यशवंत गोबाडे यांच्या फिर्यादी वरुन दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रविंद्र पवार सर, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 श्री. नितीन बगाटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त छावणी विभाग श्री महेंद्र देशमुख, पोलिस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री कृष्णा शिंदे, पोलीस निरीक्षक श्री. जयंत राजुरकर, सपोनि श्री. मनोज शिंदे, पोउपनि श्री. प्रविण पाथरकर सफौ दिनेश बन, पोह जालींदर रंधे, विनोद नितनवरे, पो.अं. सुरेश कचे, विशाल पाटील, यशवंत गोबाडे, पोअ. नितीन इनामे, गणेश सागरे, शिवनारायण नागरे यांनी केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे हे करीत आहेत.