अकलूज – येथील विजय चौकातील शिवरत्न गणेश उत्सव मंडळ व सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा’, शुक्रवार दिनांक ६ रोजी धार्मिक विधिवत व श्री गणेशाच्या जयघोषात संपन्न झाला
श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्रिकालवंदनीय श्री सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले या सर्व धार्मिक विधीसाठी मंडळाचे अध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील व मंडळातील सर्व सदस्य उपस्थितीत होते.
या निमित्ताने जयसिंह मोहिते पाटील आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील धवलसिंह मोहिते पाटील फत्तेसिंह माने पाटील स्वयं प्रभादेवी मोहिते पाटील किशोर सिंह माने पाटील यांनी धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला दोन दिवस सुरू असलेल्या या सोहळ्यामध्ये त्यानिमित्त गुरुवारी शोभायात्रा काढण्यात आली . तसेच दुपारी दोन ते पाच या वेळेत गणेश स्तवन, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नक्षत्र देवतापूजन, नांदीश्राद्ध, वास्तु शुद्धीकरण प्राण शुद्धीकरण, कंकण बंधन, जलाभिषक जलाधिवास, धान्याधिवास, शैय्याधिवास, मुख्य देवता स्थापन, पीठ पूजन व पीठ स्थापन आदी विविध कार्यक्रम झाले.
आज शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते १ वा दरम्यान पिठ देवता पूजन, गणेश स्तवन, अग्नी स्थापन, अग्निपूजन, मुख्य देवता पूजन, अभिषेक, वर्णिदान, अग्निहवन मूर्ती संस्कार हवन यासह मुख्यमूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण पूर्णाहूती आधी धार्मिक कार्यक्रम झाले असून दुपारी एक ते चार या वेळात महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला परिसरातील 5000 भाविकांनी याचा लाभ घेतला
















