बोरी / परभणी – जिंतूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्री गजानन चौधरी यांच्या वतीने बोरी येथील दत्तनगर मधील एका गरजू आजोबांना गुरुवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी व्हील चेअर भेट देण्यात आली.
भारतीय जनता किसान मोर्चा तालुका अध्यक्ष श्री दिनकर चौधरी, माजी सरपंच राजेभाऊ काळेबाग, श्री रणवीर अंभूरे, श्री तानाजी चौधरी, श्री सुभाष वाळवंटे, लक्ष्मणराव करपेवाड, भुजंग गोफणे, शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी काही दिवसापूर्वी श्री गजानन चौधरी यांची निराधार योजना समितीवर नियुक्ती केली तेव्हापासून श्री चौधरी यांनी सदर कार्य हाती घेतला आहे.
बोरी या गावातील बोरी तांडा, संभाजी नगर, दत्त नगर, झोपडपट्टी, संजय नगर आदी भागात त्यांनी गरजू नागरिकांना घरपोच भेटी दिल्या. तसेच उर्वरित भागातही भेट देऊन समस्या जाणून घेणार असल्याचे श्री गजानन चौधरी यांनी सांगितले. या कार्यक्रमास दत्त नगर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र ओळी
बोरी- येथील संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य श्री गजानन चौधरी यांनी गरजू आजोबांना व्हील चेअर भेट दिली. याप्रसंगी उपस्थित मान्यवर दिसत आहेत.


















