सोलापूर : जायंट्स ग्रुप ऑफ सोलापूरवतीने पूर्व विभाग वाचनालयास ग्रंथ (पुस्तक ) भेट देण्यात आली. हल्लीच्या पिढीला लहान ते मोठ्यानंपर्यंत मोबाईलचे वेड लागले आहे. या काळात वाचनालयचे महत्व लहानपणा पासूनच पटावे या हेतूने जायंट्स ग्रुपने इयत्ता पहिले ते नववी च्या विध्यार्थ्यांना उपयुक्त असे 47 पुस्तके वाचनालयास देणगी स्वरूपात दिले.
याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांनी जायंट्स ग्रुपचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते देणगीदार नागनाथ कोंडा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जायंट्स फेडरेशन संचालक किसन आडम, ऑफिसर श्रीनिवास कोंडले, जायंट्स फेडरेशन माजी उपाध्यक्ष नागनाथ कोंडा, वाचनालयाचे उपाध्यक्ष देविदास गोटीपामुल, संचालक विजयकुमार गुल्लापल्ली, अरविंद चिनी, दत्तात्रय कारमपुरी, गणपत कुरापाटी व ग्रंथपाल रमा इप्पलपल्ली उपस्थित होते.
——————————————–
फोटो ओळी
सोलापूर : जायंट्स ग्रुपतर्फे पूर्वविभाग वाचनालयास पुस्तक भेट देताना पदाधिकारी.

























