पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी सतत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर पुणे येथील अनिलभाई भन्साली यांनी आहुजा कंपनीचे विद्युत साहित्य व साउंड सिस्टम, तसेच नितीन वरघडे, पुणे यांनी संगणक साहित्य श्री विठ्ठल चरणी देणगी स्वरूपात अर्पण केले आहे.
ही देणगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्य मा. निगडे मॅडम यांच्या उपस्थितीत स्वीकारण्यात आली. या देणगी वस्तूंचा उपयोग मंदिर प्रशासनाच्या कार्यात व भाविकांच्या सेवेसाठी करण्यात येणार आहे.
समितीच्या वतीने दोन्ही देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, त्यांच्या या भक्तिपूर्ण कार्याला श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची कृपा लाभो, अशी शुभेच्छा व्यक्त करण्यात आली आहे.


















