तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : वडिलांच्या घरी असलेल्या लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम सोडणाऱ्या मुलीविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत संतोष मोहन भांगे वय 45 राहणार बल्लारी चाळ देगाव रोड सोलापूर यांच्या फिर्यादीवरून साक्षी संतोष भांगे वय 19 राहणार खूसगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष भांगे यांची साक्षी ही मुलगी असून 31 जुलै रोजी साक्षी हिने संतोष यांच्या घरातील देवघरात अडकवलेली चावी घेऊन घरातील लोखंडी कपाट उघडले या कपाटात असलेले संतोष यांच्या पत्नीचे सात ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स व रोग रक्कम असा 90 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला म्हणून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार चुंगे पुढील तपास करीत आहेत