सोलापूर – लोकमंगल समूहाच्या वतीने आयोजित लोकमंगल समूह क्रीडा महोत्सव 2025 मध्ये लोकमंगल पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
🏆 *सांघिक क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांकाने विजय :*
1. क्रिकेट
2. कबड्डी
3. खो–खो (पुरुष)
4. खो–खो (महिला)
5. रस्सीखेच (महिला)
🥇 *वैयक्तिक क्रीडा प्रकारात यश :*
– गोळाफेक (पुरुष) – प्रथम व द्वितीय क्रमांक
– गोळाफेक (महिला) – प्रथम व द्वितीय क्रमांक
– लांब उडी (महिला) – प्रथम व तृतीय क्रमांक
– लांब उडी (पुरुष) – प्रथम व द्वितीय क्रमांक
– 100 मीटर धावणे (पुरुष) – द्वितीय क्रमांक
– 100 मीटर धावणे (महिला) – तृतीय क्रमांक
वरील सर्व क्रीडा प्रकारांमध्ये लोकमंगल पतसंस्थेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत संस्थेला विजेतेपद मिळवून दिले. या उल्लेखनीय यशामुळे विजेता चषक परत एकदा लोकमंगल पतसंस्थेकडे खेचून आणण्याचा मान कर्मचाऱ्यांनी मिळवला.
या यशाबद्दल लोकमंगल पतसंस्थेच्या सर्व खेळाडूंचे, मार्गदर्शकांचे व संघ व्यवस्थापनाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या अथक मेहनतीस व संघभावनेला सलाम करण्यात येत आहे.
लोकमंगल पतसंस्थेचे कर्मचारी हे केवळ कामकाजातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही अग्रगण्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
















