सोलापूर – चोरीचे दागिने स्विकारणारा सराफाकडून ०६ घरफोडी चोरी गुन्हयातील ५२.६० ग्रॅम वजनाचे एकुण ७,८९,७००/- सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची महिती सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली.
आरोपी रोहित दिपक पवार याने उंबरे दहिगांव येथील घरफोडीच्या गुन्हयातील त्याचे साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले रा. चाकोरे अकलुज, भैय्या शकील शेख रा. विजबोर्ड जवळ वेळापुर याचे सोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीने वाटणीस आलेला मुद्देमालापैकी १२ तोळे सोन्याचे दागिणे सोनार कारागिर वैभव दिगंबर कुलथे रा. देशमुख गल्ली अकलुज यास विक्री केले असल्याचे सांगितल्याने या गुन्हयात बीएनएस – २३ चे कलम ३१७(२), ३(५) प्रमाणे कलम वाढ करून आरोपी नामे वैभव दिगंबर कुलथे रा. देशमुख गल्ली अकलुज यास दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपी वैभव दिगंबर कुलथे पोलीस कोठडीत असताना आरोपी रोहित पवार याचेकडुन स्विकारलेले सोन्याचे दागिने काढुन देण्याकरिता देखमुख गल्ली येथील घरी गेलो असता, आरोपी वैभव कुलथे याचे घरास कुलुप होते.
तदनंतर सोनार कारागिर आरोपी वैभव दिगंबर कुलथे याने त्याची आईकडे ठेवलेले गुन्हयातील चोरीचे दागिने त्याची आई यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तपासीक अधिकारी सपोनि / भिमगोंडा पाटील यांचेकडे हजर केले. तपासीक आधिकारी यांनी माळशिरस ०४, वेळापुर ०१, अकलुज ०१ या पोलीस ठाणेकडील असे एकुण ०६ गुन्हयातील ५२.६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण २,८८,०००/- रू त्याची (बाजार भाव प्रामणे) एकुण ७,८९,७००/- रू किमंतचे सोन्या दागिणे हस्तगत केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, भिमगोंडा पाटील व पथकातील, पोलीस हवालदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, मपोहेकों पल्लवी इंगळे, पोकों सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, मपोकों सुनंदा झळके, चापोकों दिलीप थोरात तसेच सायबर पो. ठाणे कडील पोहवा व्यंकटेश मोरे यांनी बजावली.





















