बार्शी – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, बार्शी यांच्यावतीने ईश्वरीय सेवांच्या स्वर्णिम जयंती महोत्सवाचे तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या राजयोग भवनाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी अत्यंत आध्यात्मिक, उत्साहपूर्ण व गरिमामय वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले.
समृद्धी लॉन्स येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वी, ओम शांती कॉलनी, पाटील प्लॉट, शिवाजीनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ब्रह्माकुमारीज राजयोग भवनाचे विधिवत उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी भवनाच्या नामफलकाचे अनावरण, मुख्य प्रवेशद्वार तसेच बाबांच्या कक्षात रिबीन कापून आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या राजयोगिनी उषादीदीजी यांच्या हस्ते श्रद्धा, आनंद व आध्यात्मिक भावनांच्या वातावरणात उद्घाटन करण्यात आले.
सोलापूर रोड, बार्शी येथील समृद्धी लॉन्स येथे भव्य मुख्य समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सोलापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यासह गंगाखेड, नगर, अहमदाबाद व माउंट आबू येथून सुमारे दीड हजार ब्रह्माकुमारीज कुटुंबातील बंधू-भगिनी उपस्थित होते.
याप्रसंगी राजयोग भवन व स्वर्णिम जयंती महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्त्या राजयोगिनी ब्र. कु. उषा दीदीजी (माउंट आबू, राजस्थान) यांच्या हस्ते व मंचासीन मान्यवरांच्या शुभकरकमलांनी दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
कार्यक्रमाची अध्यक्षता राजयोगिनी ब्र. कु. सोमप्रभा दीदी
(संचालिका, सोलापूर उपक्षेत्र) यांनी केली. स्वागत व सांस्कृतिक सादरीकरण कार्यक्रमाची सुरुवात प्रवेशद्वारापासून मंचापर्यंत सादर करण्यात आलेल्या ‘समूह स्वागत नृत्या’ने झाली.
समारंभास नगराध्यक्षा मा. तेजस्विनीताई कथले यांची विशेष उपस्थिती लाभली. या व्यतिरिक्त ब्र. कु. भरतभाई (संयोजक, वैज्ञानिक व अभियांत्रिकी विभाग, माउंट आबू),
राजयोगिनी महानंदा दीदी (संचालिका, उदगीर सेवाकेंद्र),
राजयोगिनी भानू दीदी (संचालिका, इंडिया कॉलनी, अहमदाबाद), राजयोगिनी गीता दीदीजी (गुजरात), ब्रह्मकुमार बाबुभाईजी (अहमदाबाद), राजयोगिनी सुनीता दीदी (संचालिका, अंबाजोगाई सेवाकेंद्र),
राजयोगिनी नंदा दीदीजी (संचालिका, लातूर सेवाकेंद्र),
राजयोगिनी शकू दीदीजी (संचालिका, इट सेवाकेंद्र),
ब्र. कु. राजेंद्र भाईजी (मुंबई), विनायकराव पाटील (माजी आमदार), प्रतापभाई शिंदे (सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता), डॉ. औदुंबर पावले, राजू भाईजी (मुरुम)
यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
बार्शीतील ईश्वरीय सेवेचा पन्नास वर्षांचा इतिहास अत्यंत गौरवशाली असून, अनेक परीक्षांमधूनही बाबांच्या विशेष मदतीने ही सेवा अखंडपणे पुढे वाढत राहिली आहे.
नवीन राजयोग भवन भविष्यात आत्मिक जागृती व सशक्तीकरणाचे केंद्र बनेल, ज्यातून ईश्वरीय सेवांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत जाईल.
अनेक संकटे व परीक्षा आल्या, पण संगीता दीदींनी कधीही आशेचा दीप विझू दिला नाही. स्वागतपर भाषण बार्शी सेवाकेंद्राच्या संचालिका संगीता दीदी यांनी केले.
सूत्रसंचालन ब्र. कु. मिताली बहन (औरंगाबाद) व अनिता बहन (बार्शी) यांनी केले.आभार प्रदर्शन मोहनभाई यांनी केले.
संपूर्ण समारंभ शांत, सकारात्मक व दिव्य आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बार्शीतील पन्नास वर्षाच्या ईश्वरीय सेवेच्या इतिहासाची चित्रफीत ही दाखविण्यात आली.


























