उमरी – नांदेड जिल्हात दरवर्षी गोल्ला गोलेवार यादव समाज हितासाठी भव्य समाज मेळावा घेवून विविध क्षेत्रात उत्कृष्टपणे कार्य करणाऱ्या समाज बांधवांना प्रोत्सानपर सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येते तरी उमरी तालुक्यातील
गोल्ला-गोलेवार समाज बांधवानी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती उमरी संचालक तथा तालुकाध्यक्ष गणेश आन्नेमवाड बितनाळकर यांनी केले आहे .
गोल्ला गोलेवार सेवा संघटना जिल्हा नांदेड यांच्या वतिने भव्य असा समाज मेळावा आयोजित करण्यात आले आहे . या भव्य मेळाव्यात खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
१) उपवधु-वर परिचय मेळावा
2) सुशिक्षीत बेरोजगार मेळावा
३)गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ४)महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम
५)समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा
६)सेवा निवृत्त कर्मचारी पदोन्नत कर्मचारी
७)नवनियुक्त कर्मचारी
८)पि.एच.डी./ Net-Set धारक
९) प्रगतीशिल शेतकररी
१०)यशस्वी उद्योजक सत्कार सोहळा
सन २०२४-२५ या वर्षातील होणार आहे हा कार्यक्रम
स्थळ आर्यवैश्य मंगल कार्यालय (वासवी माता) लातुर फाटा जवळ सिडको, नांदेड
येथे दिनांक २४ जानेवारी २०२६, वेळ सकाळी १० वाजता शनिवार रोजी पार पडणार आहे .
तरी या गुण गौरव सोहळ्यास
उमरी तालुक्यातील सर्व गोल्ला-गोलेवार यादव समाज सेवा संघटना बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उमरी गोल्ला – गोलेवार समाज संघटनेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्र . गणेश साहेबराव आन्नेमवाड यांनी केले आहे .



















