मंगळवेढा – माणसाच्या आयुष्यात चांगल्या शिक्षणाची, संस्काराची गरज असते. ते मिळाल्यामुळे एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. परंतु एक सर्व गुणसंपन्न शिक्षक अनेकांचे आयुष्य बदलून समाजपरिवर्तन घडवू शकतो.असे मत प्रा.डॉ.संजय शिवशरण यांनी व्यक्त केले.
श्री संत दामाजी महाविदयालयाच्या प्राध्यापक प्रबोधिनीमध्ये इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय शिवशरण यांचे अस्वस्थ वर्तमानातील शिक्षकांची भूमिका या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले.त्याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ.संजय शिवशरण म्हणाले, सध्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांमध्ये जी अस्वस्थता आहे .ही समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा सुस्थितीत करण्यासाठी शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रोफेसर डॉ. औदुंबर जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राध्यापक प्रबोधिनीच्या व्याख्यानापाठीमागचा हेतू स्पष्ट करुन शिक्षकांनी आपल्या प्राथमिक कर्तव्यांबरोबर सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी. आपल्या ज्ञानाचा व अभ्यासाचा समाज परिवर्तनासाठी उपयोग करावा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक प्रा.डॉ. राजेश गावकरे यांनी केले. सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा.डॉ.पी.एम.होनराव यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड, प्रा.डॉ. नवनाथ जगताप, प्रा. डॉ.डी.एस. गायकवाड, प्रा.डॉ.जे.सी. तांबोळी यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओळी – श्री संत दामाजी महाविदयालयामध्ये प्राध्यापक प्रबोधिनीमध्ये मार्गदर्शन करताना डॉ.संजय शिवशरण व उपस्थित मान्यवर
























