Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबईत क्रीडाक्षेत्राला नवी उभारी! ‘महापौर चषक २०२५–२६’ला हिरवा कंदील, तब्बल ५ कोटींचा निधी

तरुण भारतbyतरुण भारत
March 19, 2026
in editor
0
मुंबईत क्रीडाक्षेत्राला नवी उभारी! ‘महापौर चषक २०२५–२६’ला हिरवा कंदील, तब्बल ५ कोटींचा निधी
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : क्रीडाविश्वासाठी मोठी आनंदवार्ता समोर आली असून “मुंबई महापौर चषक २०२५–२६” स्पर्धेला अखेर अधिकृत मंजुरी मिळाली आहे. महापौर रितू तावडे यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खंडित झालेली क्रीडा परंपरा पुन्हा जोमाने सुरू होणार आहे. याचबरोबर स्पर्धेच्या निधीत ७५ लाखांवरून थेट ५ कोटी रुपयांची भरीव वाढ जाहीर करण्यात आल्याने संपूर्ण क्रीडाक्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

महापालिकेत उच्चस्तरीय बैठक

१८ मार्च रोजी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा संघटकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, विविध गटनेते, शिक्षण अधिकारी, ज्येष्ठ पर्यवेक्षक (क्रीडा), लेखा विभागाचे अधिकारी तसेच विविध क्रीडा प्रकारांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडाविकासाच्या विविध मुद्द्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.

 

मुंबई स्पोर्ट्सच्या मागण्यांना मोठे यश

या बैठकीत मुंबई स्पोर्ट्स तर्फे बाळासाहेब (बाळ) तोरसकर आणि क्षितीज वेदक यांच्यासह क्रीडा कार्यकर्त्यांनी मांडलेल्या ४ प्रमुख मागण्यांपैकी ३ मागण्यांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून हा क्रीडाप्रेमींसाठी मोठा विजय मानला जात आहे.

 

महत्त्वाच्या ३ मागण्यांची पूर्तता

महापौरांनी मान्य केलेल्या निर्णयांमध्ये –

१) “मुंबई महापौर चषक” स्पर्धा तातडीने पुन्हा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.
२) आयोजनास झालेल्या विलंबामुळे स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ३ महिन्यांऐवजी तब्बल ४ महिन्यांचा कालावधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
३) स्पर्धेच्या आयोजनासाठी असलेला निधी ७५ लाखांवरून थेट ५ कोटी रुपये इतका वाढवण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली.

 

क्रीडा क्षेत्रासाठी मोठा दिलासा

गेल्या ५–६ वर्षांपासून स्पर्धा न झाल्यामुळे वाढलेला खर्च आणि कमी झालेल्या संधींमुळे क्रीडाक्षेत्रात निराशा निर्माण झाली होती. मात्र आता वाढीव निधी आणि स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याने खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे महापौर रितू तावडे यांनी स्वतः खो-खो खेळाडू असल्याचे नमूद करत खेळाडूंच्या समस्या समजून घेत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले, यामुळे क्रीडाविश्वात समाधान व्यक्त होत आहे.

 

जिल्हा व राज्य स्पर्धांसाठीही अपेक्षा कायम

बैठकीत जिल्हा व राज्य निमंत्रित स्पर्धांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील करण्यात आली. ही मागणी सध्या प्रलंबित असली तरी भविष्यात यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा क्रीडा क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

 

मुंबईच्या क्रीडाविश्वाला नवी ऊर्जा

महापौर रितू तावडे यांच्या या निर्णयामुळे मुंबईच्या क्रीडाक्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून स्थानिक खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. “महापौर चषक” स्पर्धांच्या पुनरागमनामुळे मुंबई पुन्हा एकदा क्रीडाक्षेत्रात आघाडीवर झळकणार, यात शंका नाही.

 

आभार प्रदर्शन

सभेच्या शेवटी मुंबई स्पोर्ट्स तर्फे बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांनी महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, तसेच उपस्थित सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि क्रीडा प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

Post Views: 51
Previous Post

बौध्द विहारसाठी १४ वर्षाची प्रतीक्षा; मंदिर समिती कर्मचाऱ्यांना जागा दिल्यास अमरण उपोषण

Next Post

नववर्ष व गुढीपाडवा निमित्त अकलूज मध्ये बाजारात गर्दी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नववर्ष व गुढीपाडवा निमित्त अकलूज मध्ये बाजारात गर्दी

नववर्ष व गुढीपाडवा निमित्त अकलूज मध्ये बाजारात गर्दी

ताज्या बातम्या

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

जमिनीच्या वादातून महिलेची हत्या

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0958360

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!