सोलापूर : सहा महिन्यांपासून सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील गोशाळांचे अनुदान रखडले आहे. सोमवारपासुन एका महिन्याचे अनुदान देण्यास सुरूवात झाली आहे. शासकीय अनुदानामुळे गोशाळांना दान देणाऱ्यांचीही संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात ४४ गोशाळा आहेत. महागाईमुळे या गोशाळेतील गायींचे पालन- पोषण करणे कठीण बनल्याचे गोशाळा चालक सांगत आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत अनुदान वितरण करण्याची मागणी गोशाळा चालकांमधून करण्यात येत आहे .
सध्या देशी गायींना अनुदान दिले जाते. मात्र, गोशाळेत देशी गायींबरोबरच पोलिस कारवाईमधील इतर जनावरांचाही समावेश मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या जनावरांनाही अनुदान देण्याची गरज आहे. गोधनाची संख्या वाढल्याने गोशाळा चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चारा, आरोग्य, पाणी, अत्यावश्यक सेवासुविधा पुरविण्यासाठी गोशाळा चालक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. अनुदान वेळेवर मिळावे. अशी मागणी उमा बिराजदार, गोशाळा, अध्यक्षा , कट्टेवादेवी गोशाळा, वडकबाळ यांनी केली.
…
मागील सहा महिन्यांपासून गोशाळांचे अनुदान रखडले आहे. चार दिवसापासून जिल्ह्यातील काही गोशाळांना एका महिन्याचे अनुदान जमा होत आहे. उर्वरित पाच महिन्यांचेही अनुदान त्वरित मिळाल्यास जनावरांचे पालन पोषण करण्यास हातभार लागेल.
मनोज सोळसे, व्यवस्थापक,
सोलापूर पांजरापोळ गोशाळा, सोरेगाव
……
अनुदानासाठी प्रयत्न सुरू
..,,
जिल्ह्यातील गोशाळांचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले होते. मात्र चार दिवसांपासून एका महिन्याचे अनुदान जमा होत आहे. जिल्ह्यातील ४४ नोंदणीकृत गोशाळांना शासनाचे अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वरीष्ठ अधिकार्यांकडे अनुदानासंबंधी चौकशी केली असून लवकरच गोशाळा चालकांना अनुदान मिळणार आहे.
डाॅ. विशाल येवले, उपायुक्त, पशूसंवर्धन विभाग सोलापूर
















