Thursday, February 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलमुळे शासकीय खरेदी प्रक्रिया पारदर्शक अन् गतिमान – विजू शिरसाठ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 6, 2024
in top news
0
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलमुळे शासकीय खरेदी प्रक्रिया पारदर्शक अन् गतिमान – विजू शिरसाठ
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ठाणे, 6 ऑगस्ट, (हिं.स.)। शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य व सेवा घेण्यासाठी केंद्र शासनाने शासकीय ई-बाजार अर्थात गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (Gem) पोर्टल विकसित केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचा मोठा सहभाग आहे. या पोर्टलमुळे खरेदी प्रक्रिया गतिमान व पारदर्शक झाली असून शासकीय कार्यालयांना दर्जेदार साहित्य उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी येथे केले.

केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (Gem) पोर्टलचा अधिकाधिक वापर करून शासकीय कार्यालयांनी वस्तू व सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे यांच्यातर्फे शासकीय कार्यालयांचे कार्यालयप्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या.

सहसंचालक शिरसाठ म्हणाल्या की, शासकीय खरेदी धोरणानुसार शासकीय कार्यालयांना खरेदी करणे आता जेम पोर्टलमुळे सोपे झाले आहे. तसेच जेम पोर्टलवर पारदर्शकतेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी हे तणावातून मुक्त झाले असून मानसिक शांती मिळाली आहे. या पोर्टलमुळे “मेक इन इंडिया” धोरणालाही मोठे योगदान प्राप्त झाले आहे. शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य जेम पोर्टलवरून खरेदी होत असल्याने कामकाजात गतिमानता प्राप्त झाली असून परवडणाऱ्या दरात दर्जेदार साहित्य मिळत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांनी जेम पोर्टलचा वापर करून खरेदी प्रक्रिया राबवावी. ज्यांनी अद्याप जेम पोर्टलवर नोंदणी केली नाही, त्या कार्यालयांनी तात्काळ नोंदणी करावी.

जेम पोर्टलवरील खरेदीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल स्थानावर आहे. जेम पोर्टलचा प्रभावी वापर केल्याबद्दल राज्याला पुरस्कारही मिळाले आहेत. या पोर्टलवरील खरेदी प्रक्रिया सुटसुटीत असून शासकीय कार्यालयांना फायदेशीर आहे. तसेच या पोर्टलमध्ये एमएसएमई, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांना आता जेम पोर्टलवरूनच खरेदी करण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. जास्तीत जास्त कार्यालयांनी जेम पोर्टलवरून खरेदीसाठी पुढाकार घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांनी आपल्या प्रस्तावनेत राज्य शासनाचे खरेदी धोरण, धोरणातील तरतुदी, खरेदी करताना अवलंबविण्याची प्रक्रिया,जेम पोर्टलचा फायदा याविषयीची माहिती दिली. या पोर्टलचा जास्तीत जास्त वापर व्हावा,यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेम पोर्टलसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र संपूर्ण सहकार्य करणार आहे.

यावेळी केंद्र शासनाच्या जेम पोर्टलसंबंधीचे ठाणे जिल्ह्याचे नोडल अधिकारी शैलेश जाधव व त्यांच्या सहकारी मालविका रघुनाथ यांनी जेम पोर्टलवरील नोंदणी, खरेदी प्रक्रिया, ई-निविदा यासंदर्भात सविस्तर सादरीकरण केले. तसेच त्यांनी जेम पोर्टल विषयी उपस्थितांच्या विविध शंकांचेही निरसन केले.

या कार्यशाळेनिमित्त जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी व जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनीही या कार्यशाळेचे महत्व, जेम पोर्टलची शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेली उपयुक्तता, जेम पोर्टल वापरण्याविषयीचे अनुभव आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. तसेच जिल्हा कौशल्य विभागाच्या सहाय्यक संचालक संध्या साळुंखे यांनी यावेळी “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण” कार्यक्रमाविषयीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

Post Views: 12
Previous Post

आज अर्धापूर तालुक्यातील, मेंढला (बू) येथे महामार्ग ते गावात जाणार्‍या रस्त्यावरील खेड्यामध्ये बेशरमाचे झाड लाऊन आंदोलन करण्यात आले..

Next Post

पंढरपुरात चंद्रभागेला आला पूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंढरपुरात चंद्रभागेला आला पूर

पंढरपुरात चंद्रभागेला आला पूर

ताज्या बातम्या

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचासातपुतेंवर पलटवार जानकर म्हणाले मुर्दाडा ला मारण्यात काय.? #bjp

February 11, 2026

येलदरी रस्त्यावर दुचाकीची समोरासमोर धडक चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत..

February 11, 2026

कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या एम पी एल मध्ये माहूरगडचा श्री रेणुका देवी क्रिकेट संघ खेळणार.#viral

February 11, 2026

माहूर येथे होणार 100 खा टांसह. सर्व सुविधा उपलब्ध.#viral #public

February 11, 2026

कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त पारगाव येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

February 11, 2026

मला हत्येच्या कटाची माहिती नव्हती.#viral #public #trending #bjp

February 11, 2026

शिवजन्मोत्सव पाळणा सोहळा तयारीला वेग ! राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी होणार ! #public

February 11, 2026

काकांचा घातपातच: रोहित पवार..#ajitpawar #rohitpawar #politics #solapur #news

February 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0675305

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697