बार्शी – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालय उपळे दुमाला (ता. बार्शी) येथे
शासकीय रेखाकला परीक्षा २०२५ आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडली. सदर परीक्षेसाठी एकूण सात शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. वखारीया विद्यालय उपळे दुमाला, मित्र विद्यालय मळेगाव, नागनाथ प्रशाला जामगाव, संत ज्ञानेश्वर विद्यालय भातंबरे, दिलीप सोपल विद्यालय हळदुगे, आदर्श विद्यालय रातंजन, जय हनुमान प्रशाला झरेगाव आदी शाळेतील एकूण ४५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
केंद्राध्यक्ष म्हणून एन.एन महाले यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन दरवर्षी केले जाते, असे मत यावेळी केंद्र समन्वयक महाले यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक दयानंद रेवडकर, राजेंद्र बागुल, बाळासाहेब चाटे, विकास ढेंगळे, संदीप क्षिरसागर, अमोल देशमुख, सुजय संकपाळ, ब्रह्मदेव शितोळे, मोहिते, मिलिंद सुरवसे तसेच विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



















