सांगोला – पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत जास्त पदवीधरांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदार नोंदणी करावी असे आवाहन माजी नगरसेवक अॅड.गजानन भाकरे यांनी केले आहे.
पुणे विभाग पदवीधर निवडणुक येत्या काही काळामध्ये संपन्न होणार आहे. या निवडणुकी मध्ये योग्य व सक्षम प्रतिनीधी निवडून देणेसाठी मतदार यादी मध्ये नाव नोंदविणे गरजेचे आहे. या नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली असून पात्र पदवीधरांनी स्वतःची व आपल्या कुटुंबातील सर्व पात्र पदवीधरांची नोंदणी करावी व लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.