अक्कलकोट – तालुक्यातील चपळगाव-बावकरवाडी गृपग्रामपंचायतीने गावातील १० दिव्यांग लाभार्थ्यांना व कुटुंबियांना स्वावलंबी बनवत रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवुन पिठाची चक्की दिली.तर याच कार्यक्रमात इंडियन आर्मीमध्ये संपुर्ण अक्कलकोट तालुक्यातुन पहिल्यांदाच मुलीच्या रुपाने भरती झालेल्या तसलीम नासीर पटेल या युवतीचा सत्कारदेखील करण्यात आला.
शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत मिळकत कराच्या पाच टक्केची रक्कम ही गावांतील दिव्यांगासाठी खर्च करणे अपेक्षित आहे.हे उद्दिष्ट पार करत ग्रामपंचायत परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा भंडारकवठे होत्या.तर व्यासपीठावर तंटामुक्त अध्यक्ष संजय बाणेगाव,ग्रामसेवक विनोद डावरे,सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे,गणपती कोळी,ग्रामपंचायत सदस्य चित्रकला कांबळे,वंदना कांबळे,रेशमा तांबोळी,परमेश्वर वाले,सोसायटी व्हा.चेअरमन खंडप्पा वाले,कल्लपा बडुरे,प्रकाश बुगडे,तम्मा गजधाने,काशिनाथ वाले,शरणु ख्याडे,गंगाराम ख्याडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभुलिंग अकतनाळ यांनी केले तर आभार सरपंच वर्षा भंडारकवठे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपीक उमेश सोनार,पांडुरंग चव्हाण,विष्णुवर्धन कांबळे,ज्योती बाणेगांव,सिध्दु हणमशेट्टी,यमुनाबाई गजधाने,रविकांत कोरे,मिनाज पटेल,आकाश बिराजदार,अमोल गजधाने आदींनी परिश्रम घेतले.
सरपंचबाईंनी दिव्यांगाना पेढा अन् दिव्यांगाचा उर भरून आला..
चपळगांवच्या सरपंच वर्षा भंडारकवठे यांनी झालेल्या कार्यक्रमात महिला ग्रा.पं.सदस्यांसह बसवराज म्हेत्रे,ऐश्वर्या हरकुड,सुनंदा हलसगे,भुताळी आगावणे, अभिषेक बिराजदार,योगीराज घोगरे, भुमिका गजधाने,महेश स्वामी,रेशमा शेख,भाग्यश्री पाटील या दिव्यांग लाभार्थ्यांना स्वहस्ताने पेढा भरवला.यावेळी दिव्यांगांचा ऊर भरून आला.
चपळगावची सुवर्णकन्या ठरली तालुक्यातील पहिली देशसैनिक..!
चपळगाव येथील तसलीम नासीर पटेल या युवतीने मोठे कष्ट घेत इंडियन आर्मीमध्ये बीएसएफ जवान म्हणून भरती मिळवली आहे.आजकाल पालकांचा मुलींबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन म्हणावा तसा सकारात्मक नाही,परंतु या बाबीला छेद देत नासीर पटेल व कुटुंबियांनी मुलीला पाठबळ दिले.यामुळेच संपुर्ण अक्कलकोट तालुक्यातुन पहिल्यांदाच मुलीच्या रुपाने तसलीमची भरती झाली.याच कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीत मात करत बीएएमएस झालेला डॉ.धनराज सुरेश भंगे तर सर्वसामान्य कुटुंबातील समाजसेवक प्रदीप सुरवसे याचा सोलापूर विद्यापीठ अंतर्गत एमकॉम पदविकेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल ग्रामपंचायत परिवाराकडुन सत्कार करण्यात आला.



















