परतूर / जालना – ग्रामपंचायत ही गावाच्या प्रगतीचा पाया आहे. ग्रामपंचायत ही केवळ प्रशासनाचे केंद्र नसून ती गावाच्या विकासाची दिशा ठरवणारी संस्था आहे. गावकऱ्यांच्या सहभागातूनच खरी लोकशाही बळकट होते. लोकशाहीची खरी ताकद गावपातळीवर आहे, आणि प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम, पारदर्शक आणि जबाबदार असणे अत्यावश्यक आहे, ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची पाया रचना आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रामपंचायतींनी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसारख्या मूलभूत सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.
मंठा तालुक्यातील हेलस (25 लक्ष), रामतीर्थ (20 लक्ष), विरगव्हाण (20 लक्ष), हनवतखेडा (20 लक्ष) या गावात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम योजनेअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या तसेच करणावळ येथे सभामंडप (10 लक्ष), सिमेंट रस्ता (10 लक्ष) व अंगणवाडी बांधकाम (12 लक्ष) भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. गावाचा विकास ही केवळ शासनाची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी आहे. गावातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न केल्यासच खरा विकास साध्य होतो. नागरिकांनी ग्रामसभेत सक्रिय सहभाग घ्यावा, ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात आणि विकासकामांवर लक्ष ठेवावे. गावाचा विकास हा निधीच्या प्रमाणावर नाही, तर लोकांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. प्रत्येकाने आपली भूमिका ओळखून गावासाठी काहीतरी सकारात्मक योगदान दिले, तर गाव स्वतःच प्रगत होईल. युवकांनी रोजगार निर्मिती, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या उपक्रमांत आघाडी घेतली पाहिजे. असेच आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.
यावेळी आमदार लोणीकर म्हणाले, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ही चार मूलभूत क्षेत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. ग्रामपंचायतींनी या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावात जर आरोग्य सुविधा चांगल्या असतील, शाळा सक्षम असतील आणि पिण्याचे पाणी उपलब्ध असेल, तर गावाचा विकास आपोआप गती घेतो. ग्रामपंचायत ही केवळ निधी वाटप करणारी संस्था नसून ती लोकांचा विश्वास संपादन करणारी लोकशाही संस्था आहे. गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही. प्रत्येक नागरिकाने गावातील निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे, आणि ग्रामपंचायतींनी त्या सहभागाचे रूपांतर कृतीत करावे. असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतींना डिजिटल प्रशासन, पारदर्शक लेखा प्रणाली आणि शासन योजनांची अंमलबजावणी यावर भर देण्याचे आवाहन आमदार लोणीकर यांनी केले. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असला तरी त्या निधीचा योग्य वापर आणि नियोजन हे ग्रामपंचायतींच्या जबाबदारीचे आहे. गावाच्या विकास आराखड्याला ग्रामस्थांची मते घेऊन तयार करणे गरजेचे आहे, ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणावर भर देण्याची गरज आहे. गावातील महिलांच्या बचतगटांच्या कार्याची पाहणी केली आणि युवकांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे देखील आमदार लोणीकर यावेळी म्हणाले.
गावपातळीवरील लोकशाही मजबूत करायची असेल, तर प्रशासनातील पारदर्शकता ही अत्यंत गरजेची आहे. ग्रामपंचायतींनी गावाच्या विकास आराखड्याची सर्व माहिती सार्वजनिक करावी, निधीचा उपयोग लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने मांडावा आणि निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवावा. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामपंचायतींनी ऑनलाइन सेवा, ई-ग्राम योजना आणि डिजिटल हिशेब प्रणालीचा अवलंब करावा. आजच्या युगात पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासनाशिवाय विकासाचा वेग वाढू शकत नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमतेत वाढ करावी. ग्रामपंचायतींनी जनसहभागातून निर्णय घेण्याची संस्कृती विकसित करण्यावर भर दिला. गावातील नागरिकांनी केवळ निवडणुकीपुरतेच नव्हे, तर दररोजच्या विकास प्रक्रियेत सहभाग घ्यावा. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे, असे आमदार लोणीकर यावेळी म्हणाले.
यावेळी संदीप भैया गोरे नितीन राठोड सतीशराव निर्वळ कैलासराव बोराडे शिवाजीराव जाधव विठ्ठलराव काळे नागेशराव घारे डॉ. दत्तात्रय काकडे आनंद जाधव दीपक बोराडे तोफिक कुरेशी मोहनराव आडे नितीन सरकटे शरद पाटील माऊली गोंडगे राजेभाऊ खराबे तानाजी शेंडगे रामकिसन मुसळे रामकिसन बोडखे वसंतराव बागल सुभाष बागल नारायण कणसे श्रीदेव खरात जगदीश जाधव गटविकास अधिकारी संतोष गगनबोणे रमेश वायाळ नामदेव बनसोडे कैलास चव्हाण कैलास खराबे केशव खराबे दीपकराव खराबे दगडूबा खराबे सोपानराव खराबे भगवान खराबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.




















