वेळापूर – वेळापूर (ता. माळशिरस) येथे संविधान दिन आणि शहीद दिन या राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसाचे औचित्य साधून वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शहीद जवानांच्या छायाचित्रांना नम्र अभिवादन व संविधानाच्या प्रतीचे पूजन करून देशसेवेसाठी जीवन समर्पित केलेल्या जवानांचे स्मरण करण्यात आले.
यानंतर आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते फीत कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना आमदार उत्तमराव जानकर यांनी संविधान मूल्यांचे जतन, देशभक्तीची भावना आणि रक्तदानाच्या माध्यमातून समाजाला योगदान देण्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. त्यांनी सरपंच रजनीश बनसोडे यांनी घेतलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास प्रा. धनंजय साठे, दादाराजे घाडगे, सरपंच रजनीश बनसोडे, मिलिंद सरतापे, नानासो मुंगूसकर, पवार आर.बी., शिवाजी बनसोडे, अशोक बनसोडे, कैलास सुरवसे,राजाभाऊ शिंदे, रविराज गायकवाड,जावेद मुलाणी, शिवाजी पनासे, गोपाळआबा शिरसागर, विजय बनसोडे, भैय्यासाहेब बाबर, नितीन लोंढे, रायचंद खाडे,संजय देशपांडे, भागवत गायकवाड, शंकर आडत, धनाजी धांडोरे, जब्बार मुलाणी, राजू बनसोडे,जवान माने देशमुख, रणजीत बनसोडे, प्रदीप सरवदे, रणजीत सरवदे,राहुल सराटे,स्वप्नील सरवदे, अमोल पनासे,विठ्ठल माने, मिलिंद गायकवाड, शंकर लोंढे, सुभाष बनसोडे, माया जाधव, विनोद कांबळे, अमोल मंडलिक,वैभव बनसोडे,
तसेच डॉ. जयंत चव्हाण, डॉ. रोहित देशमुख, डॉ. अमित गायकवाड, डॉ. स्वप्नील नागटिळक, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अभिजित पाटील, डॉ. आबासाहेब देवकाते, आदी उपस्थित होते,
झालेल्या रकदान शिबिरामध्ये ७९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरास युवकांचा मोठा सहभाग होता.



















