नांदेड – महानगरपालिका अंतर्गत सिडको येथील झोन क्रमांक ६ मधील हडको बस स्टँड येतील पूर्ण गल्लीचा घाण कचरा रोडवर टाकला जातो आणि तो मनापाचे स्वच्छता कर्मचारी १० ते ११ वाजता येऊन तो कचरा भरून येत असतात पण आज चक्क त्यांनी तो कचरा पोत्यात भरून एका दुकानासमोर चक्क थप्पी लावली आहे त्यातून घाण सर्वेकडे पसरत आहे. याकडे सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग व स्वच्छता निरीक्षक रुपेश सरोदे यांचे दुर्लक्ष आहे.
सिडको मनापा अंतर्गत हाडको बस स्टॉप येथे दिनांक ८ नोव्हेंबर रोजी येथील गल्लीतील सर्व घान कचरा नेहमी येथील मेन रोडवर पडतो आणि ते मनपा कर्मचारी दहा ते अकरा वाजता उचलून नेत असते. पण आज एक गजब कारभार करून त्यांनी चक्क तो कचरा दहा पोत्यांमध्ये भरून येथे थप्पी लावून ठेवला आहे. त्यामुळे येथील दुकानांमध्ये दुर्गंधी पसरली आहे म्हणून येथील दुकान आज दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग व स्वच्छता निरीक्षक रुपेश सरोदे व सुपरवायझर जाधव यांना वारंवार फोन केले तरी त्यांनी फोन उचलले नाहीत. ही त्रिमुर्ती मंडळी “उंटा वरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहे.
याविषयी वारंवार आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांना सुचना करून देखील त्यांनी कुठलीही कार्यवाही करीत नसल्याने येथील स्वच्छतेचे चक्क तीन तेरा वाजले आहेत. सदरील प्रकरण विषयी विचारपूस करण्यास मिर्झा बेग, स्वच्छता निरीक्षक रुपेश सरोदे व सुपरवायझर जाधव यांना अनेक फोन केले पण त्यांनी एकही फोन घेतला नाही. वरिष्ठांच्या मर्जीती असलेली ही मंडळी गलथान कारभार करणार नाही तर काय करणार हा गलथान कारभार कधी थांबवणार अशी संतप्त चर्चा नागरिकात होत आहे.




















