Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाशिवरात्री निमित्त मोडनिंब येथील महादेव मंदिरामध्ये जय्यत तयारी

तरुण भारतbyतरुण भारत
February 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोडनिंब – सोलापूर पुणे महामार्गालगत माढा तालुक्यातील मोडनिंब हे मिरजेच्या पटवर्धन संस्थान मधील मोठे बाजारपेठ असणारे गांव,किंबहुना त्यांचे मुख्य ठिकाण होते. या ठिकाणी त्यांचा मोठा राजवाडा असुन याच्या शेजारीच पुरातन असे महादेवाचे श्री महालिंगेश्वर मंदिर आहे.हिंदू संस्कृती परंपरांमध्ये महाशिवरात्रीला अनन्य साधारण असे महत्व आहे.

या दिवशी भाविक ओम नमः शिवाय चा जप करतात जाऊन रूद्र अभिषेक, शिव पूजा करतात.धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते.याबाबत मोडनिंब गांव पुर्वी पांढरीभागात वसल्याचे सांगितले जाते,परंतु प्लेगच्या साथीत ही सर्व वस्ती पटवर्धनांच्या राजवाड्या शेजारी वसवली गेली.त्यावेळी पांढरी व परिसरात असलेला श्री.महादेवाची मुख्य पिंड मोडनिंबला आणण्याचा प्रयत्न झाला. परंतु साधारण १८ ते १९ फुट खड्डा घेऊनही पाषाण संपला नाही,तो तसा अखंड असल्याचे दिसुन आले हे खरंतर श्री.महादेवाचे स्वयंभु प्रकटीकरण समजुन तेथेच मंदिर बांधण्यात आहे,परंतु तसेच मंदिर राजवाड्याशेजारीही बांधण्यात आले.

हे मंदिर हेमाडपंथी असुन पुर्वी या मंदिराच्या कडेने चार दिपमाळ होत्या,परंतु सन १९७० मध्ये मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला व त्या ठिकाणी मोठा सभामंडप बांधण्यात आला. मंदिराच्या हेमाडपंथी वास्तुस हात न लावता समोरील बाजुस प्रशस्त मंडप बांधण्यात आला.परंतु या मंदिराचा लिखीत इतिहास उपलब्ध नाही.जुन्या जाणत्या माणसाकडुन माहित घ्यावी लागते.या मंदिरात श्री महादेवाचे वर्षभर कार्यक्रम सुरु असतात.यामध्ये पुजा करण्याचा मान गुरव समाजाकडे आहे,त्यांची चौथी पिढी आजही सेवेत आहे.श्रावणात महिनाभर अभिषेक,जप, श्री. शिवलीलामृत पोथीच वाचन करण्यात येते.महाशिवरात्रीला नामसप्ताह आयोजित केला जातो.महाशिवरात्रीला मंदिर समितीच्या वतीने नामस्मरण, भजनसंध्या, भक्तिगीते, भावगीते, आलेल्या सर्व भाविक भक्तांना दिवसभर फराळाचे वाटप केले जाते.

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलाच्या सजावटीचे कामे सुरू आहेत.महाशिवरात्रीनिमित्त उत्सवाची लगबग शिगेला पोहोचली असून विविध तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. पहाटेपासून रुद्राभिषेक, शिवपूजा, नामस्मरण, भजन-कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे.श्री महालिंगेश्वर जागृत देवस्थान असुन पिंडीमध्ये असलेल्या साळुंकी खाली सतत पाणी असते,यातले पाणी कधीही कमी होत नाही अशी धारणा आहे,आजपर्यंत तीव्र दुष्काळातही यातील ओलसरपणा कमी झाला नव्हता,प्रत्यक्ष गंगा अवतरते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

येथील श्री महादेव मोडनिंब, मोहोळ, बार्शी,उपळाई,मंगळवेढा,वरवडे इ. अनेक गावातील लिंगायत समाजाचे कुलदैवत समजले जाते,हे सर्व भाविक दरवर्षी आवर्जुन पुजा,अभिषेक,दर्शनास येत असतात. महालिंगेश्वराची देखभाल भक्त परिवार,देवस्थान ट्रस्ट वतीने केली जाते,वर्षभर विविध उपक्रम राबविणे,भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ट्रस्ट तत्पर असते.

या ठिकाणी द्वादशीला अन्नछत्र समितीमार्फत अन्नदान केले जाते.मंदिराचा सभामंडप इतर धार्मिक कामासाठी,जयंती,पुण्यतिथी उत्सवासाठी मोफत उपलब्ध करुन दिला जातो.महालिंगेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने लवकरच सभामंडपाची दुरुस्ती व गोरगरीबांच्या लग्नकार्यासाठी स्वतंत्र हाॅल बांधण्याचे नियोजन करत आहे,जागृत व पुरातन मंदिरासाठी लोकनिधितून केले जाणार आहे.

तयारी अंतिम टप्प्यात 

मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारा महादेव म्हणून या मंदिराची आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यामुळे भक्तांचा ओघ वाढला असून, सर्व भाविक भक्तांना दिवसभर फराळाचे वाटप केले जाते.महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलाच्या सजावटीचे कामे सुरू आहेत.महाशिवरात्रीनिमित्त उत्सवाची लगबग शिगेला पोहोचली असून विविध तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. पहाटेपासून रुद्राभिषेक, शिवपूजा, नामस्मरण, भजन-कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून भाविकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे.

हे मंदिर सोलापूर-पुणे हायवेवर मोडनिंब  (ता. माढा) शहरात आहे.या मंदिरात दररोज नित्य पूजा,आरती , अभिषेक , भजन व कीर्तन असे कार्यक्रम राबविले जातात. महाशिवरात्री दिवशीही विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. दररोज शेकडो भाविक दर्शन घेतात.प्रसाद वाटप करण्यात येतो.

Post Views: 10
Previous Post

जीएसटी आणि आयकर सल्लागारांची राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात

Next Post

शास्त्र विश्वाची निर्मिती, उत्क्रांती आणि घटनांचा अभ्यास करते; मानवाला स्वतःचे स्थान समजण्यास मदत होते

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शास्त्र विश्वाची निर्मिती, उत्क्रांती आणि घटनांचा अभ्यास करते; मानवाला स्वतःचे स्थान समजण्यास मदत होते

ताज्या बातम्या

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

गोल्ड लोन सोबत आता सिल्वर लोन ही मिळणार.#gold #silver #jewellery #lone

February 15, 2026

सोमनाग प्रशालेत निरोप समारंभ  उत्साहात पार

February 15, 2026

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा

February 15, 2026

उज्वल यश मिळवून आई- वडील व गुरूंचे स्थान बळकट करत स्वतःचे जीवन प्रकाशमान बनवावे

February 15, 2026

सोलापूर – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची ३ री वर्षपुर्ती

February 15, 2026

३० रेल्वे कर्मचारी आणि ९ विभागांना डीआरएम सोलापूर पुरस्कार

February 15, 2026

डीएव्ही शैक्षणिक संकुल करकंब येथे महर्षी दयानंद जन्मोत्सव उत्साहात

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0680800

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697