लातूर / चाकूर – तालुक्यातील झरी बु.येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे यांच्या वतीने झरी बु.येथे दि.०५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा भव्य असा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील हे उपस्थित होते.यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की,सतत जनमानसांच्या सोबत राहून पक्षाचे कार्ये करणार्या कार्यकर्त्यांला स्थानिक स्वराज्य संस्थांचे तिकीट देऊन कार्यकर्त्यांच्या सहकार्याने त्याला प्रचंड बहुमताने निवडून आणणार असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले.तसेच दयानंद सुरवसे यांना जिल्हा परिषदेच्या तिकटाचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिला असून कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जोमाने कामाला लागून पक्षाने दिलेल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन या मेळाव्यातून करण्यात आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, पद्माकरराव पाटील, अनिल वाडकर,संदीप शेटे,बळीराम पाटील, यशवंतराव जाधव,गणपत कवठे,यादव कर्डिले, भानुदास पोटे,रंजीत पाटील, व्यंकटराव जांभळदरे, विवेक शिंदे, अण्णाराव सोमवंशी, महादू पुणे,बाळासाहेब जाधव, माऊली जाधव,धनंजय धुमाळ, संजय भोसले,कासिम पटेल, युवराज सूर्यवंशी,नारायण राजुरे,विठ्ठल उदगीरे,बाळासाहेब पाटील झरीकर,सचिन तोरे, कांतराव चव्हाण, शेषराव मुंजाणे नितीन पाटील,तुकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी यशस्वीतेसाठी नामदेवराव सुरवसे,तुकाराम सुरवसे, दशरथ बंडे, उमाकांत डोंगरे, महबूब पठाण,चांद पठाण, रघुनाथ गुंडरे, आजम सय्यद ,तुकाराम कांबळे, भास्कर वाघमारे,विलास वाघमारे, सूर्यकांत शिंदे,दिलीप जाधव,बबन गव्हाणे,प्रशांत सुरवसे,धोंडीराम मुधाळे,गिरजाप्पा इडोरे,खंडू म्हेत्रे,इनुस शेख,शंकर मुधाळे,सैलानी सय्यद,इनुस पठाण व दयानंदभाऊ मित्र मंडळाचे विविध कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.




















