हिंगोली – तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला तहसीलदार हरिष गाडे यांनी पुष्पहार अर्पण करून सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अभिवादन केले तसेच संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, नायब तहसीलदार अनिता कोलगणे, पुरवठा निरीक्षक हेमा खाडे, महसूल सहायक अधिकारी श्रीकृष्ण दराडे, संगिता बामनपल्ले,वहिद पठाण, नितीश कुलकर्णी, महेश हिवरे, सलीम शेख, आनंद दातार, पुरवठा लिपीक डुरे, महसूल सहायक सचीन क्षीरसागर, तलाठी विठ्ठल शेळके, उमाकांत मुळे,गोपाल मुकीर , उकंडी मारकड,कापसे कोषागार कार्यालय चे रवि भालेराव, केशव पलटनकर,संगणक परिचालक विजय कदम, विनोद साळवे, आकाश कांबळे, राजू पुंडगे,ई हजर होते.



















