सोलापूर- मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने अभिवादन. जगाला एकेश्वरवादाची शिकवण देणारे , मानवा बरोबर प्राणी आणि सृष्टीतील प्रत्येक घटकांवर प्रेम करा , गरजवंताना दान करा अशी कल्याणकारी शिकवण देणारे शिख पंथाचे आद्य गुरु नानकजी यांच्या जयंतीनिमित्त अंत्रोळीकर नगर येथील गुरूद्वारात गुरुग्रंथास अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष म शफीक रचभरे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, पोपट भोसले, सौरभ भांड , माजी नगरसेवक हारुण शेख, रुस्तुम शेख, रियाज पैलवान ,रिझवान दंडोती, शोएब चौधरी , तन्वीर गुलजार, हारिस शेख, कय्युम मोहळकर आदी उपस्थित होते.

















