सोलापूर : भाई छन्नुसिंह चंदेले यांच्या ४० व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
जुना एम्प्लॅायमेंट चौकातील त्यांच्या पुतळ्याला तसेच विडी घरकुल येथील चंदेले शैक्षणिक संकुलात भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राचे उपाध्यक्ष प्रा. विलास बेत, सचिव रवींद्र मोकाशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी स्मृती केंद्राच्या विश्वस्त प्रा. डॅा. रोझा चंदेले, सुधीर चंदेले, अरविंद चंदेले, राहुल चंदेले, अमृतदत्त चिन्नी, अंबादास पवार, दत्ता सोनवणे, प्रकाश परदेशी, अन्वर मिस्त्री, गंगाधर शिंदे, गोपाळ, विलास कुलकर्णी यांच्यासह भाई छन्नुसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ गायकवाड, राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव तोळणूर, भाई छन्नुसिंह चंदेले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काकासाहेब गाढवे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.























