सांगोला – केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अधिनस्थ कार्यालय केंद्रीय भूजल मंडळ, नागपूर यांच्यावतीने बचत भवन, पंचायत समिती, सांगोला येथे भूजल विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते व केंद्रीय भूजल विभागाचे वरिष्ठ अधिकारी एस.एस.पूर्ती, उपेंद्र धोंडे तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सोलापूर जिल्हा प्रमुख डॉ.मुश्ताक शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी उमेशचंद्र कुलकर्णी एस.एसपूर्ती, अमरनाथ, उपेंद्र धोंडे, डॉ.मुश्ताक शेख यांनी मार्गदर्शन आणि ग्रा.पं.अधिकारी जयवंत लवटे, खानसाहेब मुलाणी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्थानिकांनी भूजलाची घसरती पातळी व शेततळी तसेच भूजल पुनर्भरण संरचना अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी याबद्दल उत्स्फूर्तपणे प्रश्नं विचारले तसेच आपापल्या गावातील अनुभव कथनही केले. यावेळी स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैजिनाथ घोंगडे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक, सरपंच, जलसुरक्षक, जलदूत तसेच स्थानिक सामाजिक संस्था प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी सहा.गटविकास अधिकारी वसंत फुले, पाणीपुरवठा उप.अभियंता एस.आर.पुजारी, आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद सावंत, उज्ज्वल कुमार उपस्थित होते.
केंद्रीय भूजल विभागाच्या माध्यमातून भूजलवैज्ञानिकांनी केलेल्या सविस्तर अभ्यास अहवालातील माहितीचा वापर करून स्थानिक पातळीवर भूजल व्यवस्थापन अद्ययावत करणे शक्य आहे.
– उपेंद्र धोंडे, वरिष्ठ भूजलवैज्ञानिक, केंद्रीय भूजल मंडळ

























